.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

मनोरंजक खेळ

मनोरंजक खेळ



मनोरंजक खेळ

मनोरंजक खेळाचे विडिओ  डाउनलोड करण्यासाठी
>>>>【सर्व डाऊनलोड करा क्लिक करा 】<<<<
👉👉👉येथे क्लिक करा 👈👈👈

मनोरंजक खेळ
विद्यार्थ्यांना अध्ययन निरस वाने वाटू नये म्हणून आपण अधून मधून काही मनोरंजक खेळ घ्यावेत .तसेच या खेळातून त्यांना अध्ययनाचे धडे देण्याचा प्रयत्न करावा.त्यासाठी काही खेळ मी आपल्यासमोर मांडत आहे.
——————————————————————————————————————-
01 .) 
स्मरण खेळ –विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आपण स्मरण खेळ घेऊ शकतोहा खेळ घेताना टेबलावर २० – २५ लहानलहान वस्तू ठेवाव्यात.उदामोबाईल , पेन , पेन्सील आणि त्या वस्तू मुलांना दाखवाव्यातमुलांना त्या वस्तू लक्षात ठेवायला सांगाव्यात.नंतर त्या वस्तू
कापडाने झाकून ठेवाव्यात.नंतर मुलांना लांब लांब बसून त्या वस्तू लिहायला सांगाव्यात्या वस्तू आठवताना मुलांना फार विचार करावा लागेल.जेणेकरून मुलांची स्मरण शक्ती वाढण्यास मदत होईल.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
02 ) 
ओंजळीने ग्लास भरणे –मुलांना या खेळात फार आनंद मिळतोप्रथम आपण १० – १२ मुलांचे गट करावेतनंतर समान आकाराचे गटातीलसंख्ये नुसार ग्लास
घ्यावे आणि सरळ रेषेत समान अंतरावर ठेवावेत्यानंतर ठराविक अंतरावर पाण्याच्या भरलेल्या बादल्या ठेवाव्या.मुलांना त्या बादलीतील
पाणी ओंजळीने घेऊन जावे लागेल आणि आपल्या ठरलेल्या ग्लास मध्ये टाकावे लागेलओंजळीने पाणी नेउन त्यांनाआपला ग्लास
भरावा लागेल.या खेळात ज्या मुलाचा ग्लास लवकर भरेल तो मुलगा पहिला येईलयामुळे मुलांचा शारीरिक विकास होण्यास पण
मदत होईल.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
03. ) 
ठराविक वेळेत गणिते सोडवणे –मुलांना आपण २०-२५ बेरीज , वजाबाकी किवा इतर कोणत्याही प्रकारची २०-२५ लहान लहान कोणत्याही प्रकारचीगणिते देऊ शकतो
आणि - मिनिटांचा वेळ देऊन ती गणिते आपण विद्यार्थ्यांना सोडवायला लाऊ शकतोत्या वेळेत गणिते उत्तरासहसोडवणे अपेक्षित आहे.सुरुवातीला  अंकी गणिते द्यावीत नंतर चांगला सराव झाल्यास अंक वाढवत जावेअश्याप्रकारे खेळातून गणिताचासराव घ्यावा.या खेळत १००मुलांना सहभागी करावे.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
04. ) 
एकमेकांना हसवणे –मुले जर कांटाळलेले असतील तर अश्या वेळेस हा खेळ घ्यावाकाही मुलांना सर्वांच्या समोर उभे करावे आणिबसलेल्या मुलांपैकी एकाने
येउन त्यांना हसवण्याचा प्रयत्न करावामात्र त्यांना हसवताना हात लावायचा नाहीवेगवेगळे हावभाव , वेगवेगळेआवाज काढून , विनोद
सांगून त्यांना हसवावेजे मुले हसतील त्यांना खाली बसवावे आणि जे मुले हसणारच नाहीत त्यांना या खेळाचा विजेताघोषित करावे.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
05. ) 
आवाज ओळखणे –एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे . बाकी वर्गातल्या / गटातल्या मुलांनी थोड्या अंतरावर उभे राहावे आणि त्या मुलालानाव घेऊन बोलवावे.त्या आवाजावरून डोळे बांधलेल्या मुलाने कोणी आवाज दिला ते सांगावे . जर त्याने बरोबर ओळखले तर त्याला एकगुण द्यावा .असे सर्व मुले होई पर्यंत खेळ सुरु ठेवावा . ज्याला जास्त गुण मिळतील तो विजयी घोषित करावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
06.) 
खोक्यातील वस्तू ओळखणे –एक मोठे खोके घ्यावे . त्यात लहान लहान बॉल , पेन , पेन्सिल अश्या १०-१२ वस्तू भराव्या . त्यानंतर त्या खोक्याचेतोंड बंद करावे . त्या खोक्याला एका बाजूने मुलांचे हात आत जातील एव्हडे मोठे छिद्र पाडावेनंतर एका – एकामुलाने त्या खोक्यात हात घालून हाताने चाचपडून वस्तू ओळखाव्या .
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
07.) 
वासावरून वस्तू ओळखणे –बाजारात प्लास्टिक चे ग्लास मिळतात ते आपण आणावे . पण ते ग्लास पारदर्शक नसावेत.नंतर एका – एका ग्लासातकांदा , लसुन अश्याप्रकारे वेगवेगळ्या वस्तू भराव्यात आणि ग्लासला एक एक कागद चिटकवावात्या वरचिटकवलेल्या कागदाला सुईने लहान – लहान छिद्र पाडावे आणि मुलांना त्या छीद्रातून वास घेऊन वस्तू ओळखण्याससांगावे.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
08.) 
फुगे फोडणे –लहान मुलांसाठी आपण हा खेळ घेऊ शकतो . या खेळात आपण काही फुगे फुगवून जमिनीवर सोडावे फुगे फुगवतानात्यात थोडी कमी हवा भरावी . एका – एका मुलाने येउन फुगे फोडण्याचा प्रयत्न करावापण  हात पाय लावता आणि३० सेकंदात फुगे फोडावेअसा नियम ठेवावादिलेल्या वेळेत जो मुलगा जास्त फुगे फोडेल तो विजेता घोषित करावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
09.) 
बॉल फेकून मारणे –या खेळात विद्यार्थ्यांचे दोन गट करावेएक वर्तुळ आखून वर्तुळात एक गट उभा करावा आणि दुसऱ्या गटातील मुलांनाठराविक अंतर घेऊन उभे करावेत्यांच्या हातात  प्लास्टिक चे बॉल द्यावेतप्रत्येकाला - बॉल मारता येतीलतोबॉल त्यांनी वर्तुळातील मुलांना फेकून मारावे आणि वर्तुळातील मुलांनी त्या येणाऱ्या बॉल पासून आपला बचाव करावा.जेवढे बॉल वर्तुळातील मुलांना लागतील तेवढे गुण बॉल फेकणाऱ्या मुलांना द्यावेतसर्व मुले संपल्यावर गट बदलावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
10.) 
नेमबाजी –ठराविक अंतरावर एखादी वस्तू ठेऊन मुलांनी त्या वस्तूला बॉल ने नेम मारावा . प्रत्येकाला - संधी द्याव्यात जेवढ्यावेळा मुलाचा नेम लागेल तेवढे गुण त्या मुलाला द्यावेतजास्त गुण घेणारा मुलगा विजेता घोषित करावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
11.) 
विद्यार्थी ओळखणे –एका ओळीत ठराविक १०-१५ विद्यार्थी उभे करावे आणि एका मुलाला ते विद्यार्थी अनुक्रमे कसे उभे राहिले आहेत तेपाहायला लावावे . आणि तोंड फिरून नंतर त्याने त्याच क्रमाने उभे असलेल्या मुलांची नावे सांगावीनावाचा क्रमचुकल्यास तिथून पुढचे सगळे चुकीचे ठरवावेअश्याप्रकारे जो मुलगा जास्त विद्यार्थी क्रमाने सांगेल तो विजेता ठरवावा.
—————————————————————————————————————–

👉👉👉येथे क्लिक करा 👈👈👈
—————————————————————————————————————–
12.) 
बादलीत चेंडू टाकणे –एक मोठी बदली घेऊन ठराविक अंतरावर ठेवावी आणि फुटबॉल / vollyball घेऊन त्या बादलीत टाकण्यास सांगावे.प्रत्येक मुलाला तीन संधी द्याव्यात . मुलाने किती वेळा बॉल बादलीत टाकला आणि बॉल बादलीत थांबला यावर क्रमांकठरवावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
13.) 
संदेश पोचवणे –या खेळात १०-१५ मुलांना एका ओळीत बसवावे आणि आपण समोर बसलेल्या मुलाला जवळ बोलवून त्याला एखादेव्याक्य सांगावेत्या मुलाने जाग्यावर जावून त्याच्या मागे बसलेल्या मुलाच्या कानात ते वाक्य सांगावेअश्याप्रकारेमुलांनी आपापल्या मागील मुलाला ते वाक्य सांगावे आणि सगळ्यात शेवटी बसलेल्या मुलाने ते वाक्य सगळ्यात पुढेयेवून सांगावेआपण पहिल्या मुलाला सांगितलेले वाक्य आणि शेवटच्या मुलाचे वाक्य फार वेगळे येते.
14.) 
आंधळी कोशिंबीर –हा खेळ खेळताना एका मुलाचे डोळे रुमालाने बांधावे.बाकीच्या मुलांनी एक वर्तुळ करून आत थांबावेडोळे बांधलेल्यामुलाने वर्तुळातील एखाद्या मुलाला पकडावे आणि कोणाला पकडले ते ओळखावे . वर्तुळातील मुलांनी डोळे बांधलेलामुलगा वर्तुळाच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घ्यावीत्याला वेळोवेळी सूचना द्याव्यातपट्टी बांधलेला मुलगा ज्यामुलाला पकडेल  ओळखेल त्या मुलाच्या डोळ्यावर नंतर पट्टी बांधावी आणि खेळ पुढे सुरु ठेवावा.
—————————————————————————————————————–
—————————————————————————————————————–
15.) 
विष – अमृत –एक मोठे वर्तुळ आखावे . त्यात सर्व मुले पळतीलत्यांना एक मुलगा शिवायला जाईलतो ज्या मुलाला शिवल त्यामुलाला विष मिळाले असेल त्यामुळे त्याने खाली बसावेदुसऱ्या मुलांनी त्या बसलेल्या मुलाला शिउन अमृत द्यावे.अमृत मिळाल्यास तो बसलेला मुलगा उठून पळू शकतोविष देणाऱ्या मुलाने त्यांना अमृत देण्यापासून थांबवावे.
—————————————————————————————————————–
————————————————————————————————————

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा