.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे

अप्रगत विद्यार्थ्यांसाठी वाचन टप्पे

��������������
���� महाराष्ट्र ॲडमीन पँनल प्रस्तुत उपक्रम����
��������������

पायाभूत चाचण्या आता जवळपास संपल्या आहेत. आपणास आपल्या वर्गात एकही अप्रगत विद्यार्थी राहू द्यायचा नसेल, किंवा प्रगत विद्यार्थ्यांमध्ये किमान 10% गुणवत्तावाढ नोंदवायची असेल तर ही लेखमाला वेळ देऊन अवश्य वाचा.

��������������
��चला बनवूया प्रगतवर्ग��
��������������

��������������
��उपक्रमांची मांदीयाळी-[अंक- तिसरा]��
��������������

��������������
�� ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन कसे शिकवावे ��
��������������

��आपल्या अध्यापनामध्ये खास ज्ञानरचनावाद पध्दतीचा उपयोग करु इच्छिणाऱ्यांसाठी

��वाचन अधिगम विद्यार्थी, डिस्लेक्सिया, मुखदुर्बल, मतिमंद, वाचादोष, मतिमंद अशा विशेष विद्यार्थ्यांनाही ही पध्दती थोड्याफार फरकाने वापरता येते.

��या पध्दतीचा उपयोग करण्यासाठी याच अंकातील भाग-1 "वाचनाचे टप्पे" हा लेख वाचने आवश्यक.
हा पुर्ण लेख वाचण्यासाठी क्लिक करा.
http://tanajisomwanshi.blogspot.in/p/blog-page_92.html?m=1

⚠️ वरील लेखात दिलेला वाचनाचा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा हे प्रकट वाचनाशी संबंधित आहेत. आता आपण पाहणार आहोत, ज्ञानरचनावाद पध्दतीने प्रकट वाचन कसे शिकवावे.

�� ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-

1. वाचन पुर्वतयारी
2. अक्षर ओळख
3. स्वरचिन्हे ओळख
4. जोडशब्द ओळख
5. वाक्यवाचन
6. परिच्छेद वाचन
7. आकलन

��पहिला टप्पा
����������������
�� वाचन पुर्वतयारी ��

या टप्प्यात खालील प्रकारे वाचनपुर्व तयारी करुन घ्यावी.

1.नजरेने आकारातील साम्यभेद ओळखणे.

2. साम्यभेदाआधारे चित्रवाचन करणे.

3.परिचीत चित्रांसोबत त्याच्या शब्दकार्डांचे अंदाजे वाचन करणे.

4.वाचनासाठी डावीकडुन उजवीकडे नजर फिरविण्याचा सराव.

5. बोललेले शब्द डावीकडुन उजवीकडे लिहिले जातात हे समजणे.

6. शब्दकार्डांचा संबंध चित्राशी व इतर दृश्य वस्तुशी जोडणे, याचा सराव. यासाठी आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात.
उदा- [खालील उदाहरणे नमुनादाखल आहेत]

1. आपल्या वर्गातील सर्व मुलांच्या नावाचे नामपट्या बनवून घ्या. या नाम पट्या त्यांना हाताळण्यास द्या. उपस्थित विद्यार्थीनी आपापल्या नावाचे टँग भिंतीस लावण्यास सांगणे.सर्व पट्या एकत्रीत करुन त्यामधून स्वतःच्या नावाची नामपट्टी ओळखण्यास सांगणे. नंतर नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या ओळखण्यास सांगणे. मुले स्वतःचे व इतराचे नाव चार दिवसात ओळखण्यास वाचण्यास शिकतात.
2. वर्गातील वस्तुंच्या नामपट्या दोन संचामध्ये तयार करुन घ्या.एक संचातील पट्ट्या वस्तूंना डकवा. दुसऱ्या संचातील पट्ट्या मुलास द्या. तुझ्या पट्टीवर जे नाव लिहिले आहे ती वस्तू शोधण्यास  सांगणे. किंवा एखाद्या वस्तूची नामपट्टी शोधून काढण्यास सांगणे.

3. परिचित चित्रांचा व त्याच्या नामपट्यांचा वापर करुन विविध खेळ घेऊ शकतो.

 -सलग तीन दिवस मुलांना चित्र व त्याखाली शब्दकार्ड लावून वाचन करुन घ्या. नंतर चित्राखाली बोट ठेवुन नावाचे वाचन घ्या. सर्वांस शब्दकार्ड वाटा.व एकच चित्रकार्ड दाखवुन याचे नाव कोणाकडे आहे त्याला पुढे बोलवा. चित्रशब्दकार्डाखाली लावुन खात्री करु द्या.अशीच सर्व चित्रशब्दकार्ड शोधण्याचा सराव घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची शब्दकार्डाशी जोड्या लावणे खेळ घेणे.
पुढील तीन दिवस शब्दकार्डाची चित्रकार्डाशी जोडी लावणे.

-चित्रपट्टीच्या खाली इतर चित्रांचे नाव टाका. अशा खुप चित्रपट्या बनवा. आता एक चित्रपट्टी विद्यार्थ्यांस द्या.व त्याखालील नाव वाचून त्याचे चित्र असणारी चित्रपट्टी शोधून त्यासमोर लावा. आता या चित्रपट्टीच्या खालील नावानुसार पुढील चित्र, त्यानंतर त्यापुढील चित्र अशी चित्रांची आगगाडी बनविण्यास सांगा.

-असे अनेक चित्र-शब्द खेळ घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही.

7. दहा शब्द झाले की, वाक्यवाचन सुरु करावे.
उदा- हा आंबा(चित्र)आहे. असे वाचन करणे. नंतर चित्राजागेवर शब्द ठेवुन वाक्य वाचनाचा सराव घेणे.

8. दृकशब्दसंपत्ती वाढ ४० पर्यंत जाणे ही वाचनपुर्वतयारी झाली. इथपर्यंत मुले अंदाजाने वाचतात पुर्ण शब्द वाचतात.पण हे प्रत्यक्ष वाचन नव्हे.

9. प्रत्यक्षवाचनासाठी मुले शब्दाचा एकत्रित विचार करतात व वाचन सुलभ होते.

------------------------------------------------------

आता दुसरा टप्पा
��������������

�� अक्षर ओळख ��

या टप्प्यात खालील प्रकारे अक्षर परिचय व त्याचे दृढीकरण करुन द्यावे.

1.चित्राआधारे शब्दाचे अंदाजे वाचन करणे.

2. चित्राशिवाय शब्दाचे सरावाने वाचन करणे.
[कमीत कमी ८ दिवस सराव आवश्यक, विविध पध्दतींचा अवलंब]

3. परिचीत शब्दाचे सावकाशपणे वाचन करणे.
[४ दिवसात सरावाने वाचन]

4. त्या शब्दातील प्रत्येक अक्षर सुटे करुन वाचणे.
[पुढील ५-६ दिवस]

5. अक्षराच्या आकारातील साम्यभेद ओळखून मुळ अक्षराचे अंदाजाने वाचन करणे.
[किमान ८ दिवस सराव आवश्यक]

यासाठी खालील उपक्रम राबविता येतील.

�� वर्गातील प्रत्येक मुलाला स्वतःचे नाव खुप आवडते व ते ७-८ दिवसात त्याच्या नाम पट्यावरील प्रत्येक अक्षर वेगवेगळे करुन वाचते. ते त्याला हाताळण्यास व वाचण्यास प्रोत्साहन द्या. नंतर त्याच्या जिवलग  मित्रांच्या नामपट्यातील अक्षरे सुटे वाचण्याचा सराव व नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या वाचनाचा सराव घेणे. अवघड वाटणारे नाव टाळावे.

�� यानंतर वर्गातील वस्तूंच्या नाम पट्ट्यांचा सराव घ्या. वस्तूंना अडकावलेल्या शब्दातील सोप्या अक्षराचे वाचन करण्यास प्रोत्साहीत करा.

�� यानंतर परिचीत व आवडणारे शब्दपट्या हाताळण्यास देऊन त्यातील अक्षराचे वाचन घ्यावे.

�� आता प्रत्येक मुळाक्षराची अक्षरकार्डांची २-३ संच बनवावीत.व ती हाताळण्यास आणि वाचनास द्यावीत. एकाच मुळाक्षरांच्या दोन अक्षर कार्डे शोधणे. त्यांचे वाचन करणे.

�� विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत.या टप्प्यात आपणास फक्त मुळाअक्षरओळख शिकवायची असल्याने त्याला अवघड वाटणारा  शब्द नको. शब्दातील अक्षर वाचन करताना त्याच्या स्वरचिन्ह वाचनाकडे लक्ष देऊ नये. फक्त मुळाक्षर वाचनच घ्यावे.
उदा- "शाळा" शब्द वाचताना पहिल्या अक्षरसास 'श' म्हटले की 'शा' हे पाहू नका. या टप्यात हे दोन्ही बरोबरच.

6. अक्षराचे दृढीकरण.
 वरील प्रत्येक टप्यात आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात.

उदा- [खालील उदाहरणे नमुनादाखल आहेत, याप्रमाणे अनेक उपक्रम घेता येतात.]

��अक्षर कार्डांच्या मदतीने अक्षर कार्ड व शब्दाशी जुळवणे.
उदा- "शाळा" या शब्दकार्डाशी जुळविण्यासाठी 'श' व 'ळ' अक्षरकार्डे शोधून ती त्याखाली मांडणे व वाचन करणे. या ठिकाणी प्रथम तो 'श' 'ळ' अक्षरकार्डास 'शाळा' असेच वाचण्याची शक्यता असते. त्यास येथे थांबवू नका. चूक सांगू नका. काही दिवसाच्या सरावानंतर इतरांचे अनुकरण करत तो आपोआप त्यास 'श' व 'ळ' म्हणू लागेल. असे नाही घडल्यास त्यास नंतर 'श' व 'ळ' असे वाचण्यास प्रोत्साहित करा.

�� चित्रकार्डाशी अक्षरकार्डाच्या जोड्या लावणे.
यात एक अक्षरकार्ड देऊन त्याचे वाचन करणे.
-अक्षरापासून सुरु होणारे चित्रकार्डे शोधणे.
-अक्षराने शेवट होणारे चित्रकार्डे शोधून काढणे.
-अक्षर मध्ये असणारे चित्रकार्डे शोधणे.

�� अक्षराचे मोठे आकार वर्गात काढा. व त्यावर विविध वस्तू [चिंचोके, दगड, फुले,इ.] ठेऊन आकार पुर्ण करणे.
�� शिक्षकाने हवेत अक्षराचे आकार काढणे व विद्यार्थ्यांनी ओळखणे, नंतर स्वतः अक्षर सांगणे व विद्यार्थ्यांना त्याचे हवेतील आकार काढण्यास सांगणे. दोन विद्यार्थी किंवा गटामध्येही असा सराव घेता येतो.

�� पाटीवर/जमीनीवर माती/वाळू पसरणे व त्यावरील अक्षराचा आकार ओळखणे. नंतर तसे आकार बोटाने काढण्याचा सराव घेणे.
��अक्षरकार्डे जोडून शब्द [फक्त स्वरचिन्ह विरहीत शब्द] बनविणे व त्याचे वाचन. यात विद्यार्थी प्रथम अर्थहीन शब्द बनवतील व वाचतील, हळूहळू अर्थपुर्ण शब्द बनविण्यास प्रोत्साहन देणे.

�� असे अनेक चित्र-शब्द खेळ/उपक्रम घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही.

�� वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी एकही अपरिचित शब्द नको.

�� पुरेसा सराव व विविध पध्दतीचा अवलंब जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील.

7. हळूहळू शब्दवाचनासोबत वाक्यवाचन सुरु करावे.
उदा- 'मगर' ही शब्दपट्टी आहे. शब्दाचे वाचन करुन नंतर  त्या  शब्दापासून वाक्य बनविण्याचा सराव घेणे.
-ही मगर आहे.
-मगर मोठी आहे. इ.

8. प्रत्यक्ष शब्दवाचनाचा सराव सुरु झाल्यानंतर सुरुवातीस परिचीत व नंतर अपरिचित शब्दवाचनाकडे जावे. [मुर्ताकडून अमुर्ताकडे]

9. 'अक्षरओळख' या टप्प्यात किमान २५-३० अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक अक्षरांचा सराव घ्यावा.परंतु त्याच अक्षरांच्या ओळखीमध्येच न अडकता आपला पुढील टप्पा "स्वरचिन्ह ओळख" घ्यावा. या टप्यात इतर अक्षरे हळूहळू सरावाने येतात.

��पुढील टप्पे पुढील लेखमालेत सविस्तरपणे पाहू!

��संदर्भ- कुमठे बीट उपक्रम

��➡��➡��➡ क्रमशः

��तुम्हीही तुमच्या वर्गामध्ये असेच उपक्रम राबवत असाल तर आपले लेख, साहित्य फोटो, प्रतिक्रिया मला 7767992852 वर अवश्य कळवा. निवडक लेख व फोटोंना आपल्या नावासह ब्लॉगवर प्रसिध्द केले जाईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा