.

सुस्वागतम्

सुस्वागतम ! सुस्वागतम !! सुस्वागतम !!! माझ्या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत ......

गुरुवार, ३० मार्च, २०१७

युएसबी प्रतिरोध

 युएसबी प्रतिरोध :- हे टुल ‘सी-डॅक’ने विकसित केले आहे. अलीकडच्या काळात पेन ड्राईव्हसारख्या युएसबी ड्राईव्हचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. सुलभ स्टोअरेजसाठी युएसबी अतिशय उपयुक्त ठरणारे आहे. मात्र याचा तोटादेखील आहे. एक तर याच्या माध्यमातून आपल्या संगणकात व्हायरस, मालवेअर आदी घातक बाबी सहजगत्या प्रवेश करू शकतात. आणि याचसोबत याच्या मदतीने कुणीही आपल्या संगणकातील महत्वाची माहिती चोरून नेऊ शकतो. नेमका यालाच प्रतिबंध घालण्यासाठी ‘युएसबी प्रतिरोध’ हे टुल सादर करण्यात आले आहे. विंडोज ७ आणि १० या आवृत्तींवर चालणार्‍या संगणकात याचा वापर करता येणार आहे. एकदा याला संगणकावर इन्टॉल केल्यानंतर संबंधीत युजर युएसबीला पासवर्डने संरक्षित करू शकतो. अर्थात त्याच्या शिवाय कुणीही अन्य व्यक्ती त्याच्या संगणकाला युएसबी ड्राईव्ह लाऊन माहिती मिळवू शकत नाही. यासोबत युएसबीच्या माध्यमातून संगणकात शिरणार्‍या व्हायरस आणि मालवेअर्सलाही अटकाव करता येतो. हे टुल खालील लिंकवर उपलब्ध आहे.

खालील लिंकवर क्लिक करून कुणीही याचा वापर करू शकेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा